नाशिक मध्य मतदारसंघात झालेली ही निवडणूक चर्चेत राहिली होती. ड्रग्ज प्रकरणासारख्या नकारात्मक प्रचारासह भाजपमधील अंतर्गत नाराजीला सामोरे जात प्रा. देवयानी फरांदेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना यांचा वापर करून विजय खेचून आणला.
फरांदेंना १,०४,९८६ मते मिळाली, तर वसंत गितेंना ८७,१५१ मते मिळाली. ‘वंचित’चे मुशीर सय्यद ३०६२ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले.
विजयामागील कारणे
- हिंदुत्वाचा प्रभाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘एक है तो सेफ है’चा संदेश आणि योगी आदित्यनाथ यांची ‘कटेंगे तो बटेंगे’ घोषणा भाजपसाठी फायदेशीर ठरली.
- महिला मतदारांचा पाठिंबा: लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.
- धार्मिक ध्रुवीकरण: अल्पसंख्याक मतांसाठी भाजपने बदलेली रणनीती आणि धार्मिक ध्रुवीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली.
- पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास: फरांदेंनी त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या विकासकामांचा मोठा फायदा झाला.
आकडेवारी
- एकूण मतदान: १,९९,२१३
- विजयी उमेदवार (भाजप): १,०४,९८६
- ठाकरे गट: ८७,१५१
- वंचित बहुजन आघाडी: ३०६२
आमदार फरांदेंनी आपला विजय सर्व कार्यकर्ते आणि जनतेला समर्पित केला असून, २१०० रुपयांच्या वचनाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.