महायुती सरकारच्या नेतृत्वाचा पेच सुटला..

राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण […]

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानात!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे […]

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार यावर सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच: शिंदे-भाजप युतीत मुख्यमंत्रीपदावर वाद

महाराष्ट्र विधानसभेच्या 14 व्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, महायुतीच्या सरकारच्या सत्तास्थापनेसाठी ताणलेला पेच अजून सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुख्यमंत्रीपदावर वाद निर्माण झाल्याने राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून दोन ऑफर, शिंदे नाराज:मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. […]

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची हालचाल: एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता महायुती सरकारने राज्यात नवीन सरकार […]

विडी कामगार नगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून: आठ-दहा जणांचा मिरची पूड टाकून हल्ला

नाशिक – आग्रा रोडवरील विडी कामगार नगरमध्ये रविवारी (दि. २४) रात्री एका तरुणावर आठ ते दहा संशयितांनी मिरची पूड फुंकारून आणि कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. या घटनेत विशांत भोये (वय २९, रा. विडी कामगार शाळेमागे, अमृतधाम) हा मृत पावला. विशांत हा स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसोबत गप्पा मारत असताना, अचानक आठ ते दहा महिला […]

नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रा. देवयानी फरांदेंनी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार वसंत गितेंचा १७,८३५ मतांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला

नाशिक मध्य मतदारसंघात झालेली ही निवडणूक चर्चेत राहिली होती. ड्रग्ज प्रकरणासारख्या नकारात्मक प्रचारासह भाजपमधील अंतर्गत नाराजीला सामोरे जात प्रा. देवयानी फरांदेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना यांचा वापर करून विजय खेचून आणला. फरांदेंना १,०४,९८६ मते मिळाली, तर वसंत गितेंना ८७,१५१ मते मिळाली. ‘वंचित’चे मुशीर सय्यद ३०६२ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. विजयामागील कारणे आकडेवारी […]

नाशिक पूर्वेत राहुल ढिकले यांचा सलग दुसरा विजय; विकासाच्या मुद्द्यांसह हिंदुत्वाचा प्रभाव

नाशिक पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचा ८७,८१७ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. अ‍ॅड. ढिकले यांना १,५६,२४६ मते मिळाली, तर गिते यांना ६८,४२९ मते मिळाली. ढिकले यांच्या विजयात पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण भागातील स्पर्श, गोदाकाठाचा कायापालट, तपोवनातील ७१ फूट उंचीची मूर्ती, […]

महायुतीचा दणदणीत विजय, आदिती तटकरे श्रीवर्धनमध्ये विजयी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीला दणदणीत विजय मिळवताना दिसत आहे. २८८ मतदारसंघांपैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचीच स्थिती आहे. आदिती तटकरे यांचा विजय निश्चित राज्यातील पहिला निकाल श्रीवर्धन मतदारसंघातून जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी १५ व्या फेरीअखेर ५४,००० पेक्षा जास्त मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. आदिती […]

नाशिक जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची आघाडी

आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला असून, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये विविध उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मुख्य मतदारसंघांमधील स्थिती: नाशिक पश्चिम: देवळाली: नाशिक पूर्व: मालेगाव बाह्य: सिन्नर: बागलाण: नाशिक मध्य: येवला: दिंडोरी: चांदवड:


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427