राजकिय

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंचे आंदोलन

राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत तसेच पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवारी  राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. मुंबईतील वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि  मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याआधी मुंबईत बोरिवली, मुलुंड येथील तहसील कार्यालयावर रिपाइंने आंदोलन केले.
ज्या झोपडीवासीयांनी सन 2019 च्या निवडणुकीत मतदान केले आहे, अशा झोपडीवासीयांची झोपडी पात्र करावी, सन 2019 पर्यंतच्या झोपड्या शासनाने  अधिकृत कराव्यात, राज्य सरकारने नोकरीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा, अनुसूचित जाती जमातींना मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरिबांना आरक्षण लागू  करावे, गायरान जमिनीवरील भूमीहीनांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी १४ एप्रिल १९९० च्या शासन निर्णयातील कट ऑफ डेट शिथिल करून १४ एप्रिल २००० साला पर्यंतचे गायरान जमिनीवरील दलित भूमीहीनांचे अतिक्रमण नियमित करावे आदी मागण्याचे निवेदन रिपाइंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी मोर्च्यामध्ये रिपाइंच्या मुंबई महिला अध्यक्षा अॅड.अभया सोनावणे, युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, मुंबई सचिव रतन अस्वारे, उषा रामालूसह रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close