सामाजिक

कांदिवलीत तुंबलेल्या गटारीमुळे रहिवासी त्रस्त

मुंबईत महापालिकेची मान्सूनपुर्व नाले व गटार सफाई सुरु आहे. मात्र कांदिवलीतील वडारपाडामधील लोकमान्य चाल क्र. १ येथील गटार येथील गेल्या महिनाभरांपासून सांडपाण्याने भरलेली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच तुंबलेल्या गटारीतील सांडपाणी येथील रहिवाशांच्या घरांपर्यत जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त असून सदर गटार साफ करण्याची मागणी शिवप्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण साळुंखे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close