सामाजिक

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिबळ्या वाघ घेतला दत्तक

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी आज ना.रामदास आठवले यांनी त्यांचे  सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेतला. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले उपस्थित होत्या. वन अधीक्षक एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र ना.रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले.या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा तृतीय वाढदिवस आज केक कापुन आणि बुद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमाचे संयोजन रिपाइंचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी केले.
यावेळी बिबळ्या वाघ (पँथर) सिम्बा ला भेटण्यास ना.रामदास आठवले; त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि पुत्र जित आठवले आले असता  सर्वजण सिम्बा सिम्बा असा बिबळ्या वाघाला आवाज देत होते मात्र त्याने कुणाला ही दाद दिली नाही. मात्र ना.रामदास आठवले यांनी सिम्बा या बिबळ्या वाघाला(पँथर ) ला सिम्बा असा आवाज दिल्यानन्तर तो पँथर रामदास आठवले नावाच्या दलित पँथर ची हाक ओळखून त्यांच्या जवळ येऊन उभा राहायचा. उपस्थीत सर्वांना दलित पँथर च्या आपल्या नेत्यातील पँथर  ची आठवण झाली आणि दोन्ही पँथर सोबत फोटो काढण्यास सर्वांनी गर्दी केली. या गर्दीत पँथर सोबत पँथर चा फोटो घेता  आला. यावेळी हरिहर यादव;  ऍड. अभया सोनवणे; सोना कांबळे;उषाताई रामळू; वंदना बेला मेहता; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close