राजकिय

भूमिपूजन करणारे कोरोना काळात कोठे होते आ.भातखळकर यांचा सवाल

भाजपच्या काळात सुरु झालेल्या कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करण्यासाठी येत असलेले पालकमंत्री कोरोनाच्या काळात कोठे होते? असा सवाल मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनीं केला. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ५२ मधील ‘पोलखोल’ सभेत ते बोलत होते. यावेळीं माजी नगरसेविका प्रीती सातम, संतोष मेढेकर, आनंद परब, माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थीत होते.
जाहिरात
यापुढे आ.भातखळकर म्हणाले, कोरोनाच्या काळात जनता बेडसाठी वणवण फिरत होती, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता, इंजेकशन मिळत नव्हते तेव्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे घरात होते. उपनगरातील एकही रुग्णालयात त्यांनी भेट दिलीं नाही. त्यावेळी ते कोठे होते, याचे त्यांनी उत्तर द्यावे आणि नंतर भूमिपूजने करावीत. केवळ अहंकारापोटी आरेतील मेट्रोचे काम बंद केले. आता प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे, त्याचा भर सामान्य मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालय ५-६ वर्षांपासून बंद आहे. त्याच्या पुनर्वसनाची आता निविदा काढली आहे. पत्राचाळीतील ६७२ मराठी कुटुंबे गेल्या १०-१२ वर्षांपासून रस्त्यावर आहेत. त्यांना घरभाडे मिळत नाही. मराठी माणसाला बेघर करून स्वतःचे इमले चढवले हेच का मराठी प्रेम? असा सवाल आमदार भातखळकर यांनी केला. यावेळी माजी नगरसेविका प्रीती सातम यांसह अनेक पदाधिकार्‍यांची भाषणे झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close