राजकिय

महिलांनी एकत्र येत बचत गटाची स्थापना करावी, शिवसेना त्यांना सहकार्य करेल

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र. १ आयोजित महिला सबलीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विभागातील महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिलांना शिलाई यंत्राचे वाटप व महिलांना साडी वाटप करण्यात आल्या. यावेळी घोसाळकर यांनी बोलतांना वाढदिवस हा मुख्यतः परिवारासोबत साजरा केला जातो. मात्र तुम्ही सर्वजण आमच्या परिवारातील सदस्य असल्याने तुम्हा सर्वांसोबत माझा वाढदिवस साजरा करत असल्याचे सांगितले. महिलांनी एकत्र येत बचत गटाची स्थापना करावी, शिवसेना त्यांना पूर्णतः सहकार्य करेल, असे आवाहनही केले. ते भावेश बँक्वेट हॉल, न्यु लिंक रोड, बोरीवली येथे आयोजित  कार्यक्रमात म्हणाले.
सध्या अनेकांचे बेगडी हिंदुत्व प्रेम जागे झाले असून त्याचा त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार व्यक्ती कुठल्याही जाती-धर्माची असली तरी त्यांचे काम करा अशी शिकवण आम्हाला मिळाली असून त्यानुसार आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणुकीपूर्वी दिलेली अच्छे दिनाच्या शासन गेले कुठे असा सवाल माजी नगरसेवक मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणात पेट्रोल, डिझेल गॅस सिलिंडरचे वाढते भाव सांगत भाजप सरकारची पोलखोल केली.
 या प्रसंगी उपस्थित महिलांना समाज विकास अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन स्वलंबी बनण्याचे आवाहन केले. याप्रसंगी  शिवसेना प्रवक्ता आनंद दुबे, विनय शुक्ला, शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल, तेजस्वी घोसाळकर, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, घोसाळकर यांच्या पत्नी वैभवी घोसाळकर, पुत्र सौरभ, सून पूजा घोसाळकर उपस्थित होत्या. तत्पूर्वी दहिसर विद्या मंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे सहित मोठ्या संख्येने शिवसेना तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close