राज्यात भारनियमन असतांना मुंबईत मात्र पालिका कार्यालयात दिवसाढवळ्या विजेची नासाडी होतांना दिसून येत आहे. मालाड येथील पालिकेच्या पी.उत्तर विभाग कार्यालयात प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेचा दुरउपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळमजल्यावर असलेल्या झुंबर आणि इतर वीज दिवे भर दिवस सुरु ठेवले जात आहे. यामुळे नको त्या उपकरणांसाठी विज वापरली जात असल्याने या कार्यालयात विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. या गंभीर विषयाकडे महापालिका आयुक्तानी लक्ष घालण्याची मागणी त्यांच्यांकडून केली जावू लागली आहे.
पालिका पी.उत्तर विभाग कार्यालयाची नवीन इमारतीचे गेल्या वर्षी उद्दघाटन करण्यात आले. ६ मजली असलेल्या या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर विजेचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. याकडे विभागातील सहाय्यक आयुक्त यांचे दुर्लक्ष असल्याने दिवसाढवळ्या विजेची नासाडी होत आहे.
एकीकडे राज्यातील खेड्यांमध्ये भारनियमन सुरु असतांना पालिका कार्यालयात अशाप्रकारे विजेची नासाडी होत आहे. यासाठी आता राज्य सरकारने मुंबईतील पालिका कार्यालयासह इतर सर्व शासकीय कार्यालयात विज पुरवठ्याचा आढावा घेवून विजेची नासाडी करणा~या कार्यालयातील जबाबदार अधिका~यांकडून विज बिले वसूल करण्याची मागणी फाईट फाॅर राईट फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी केली आहे.