मुंबई
मुंबईचा वडापाव २ ते ३ रुपयाने महागला

देशात गेल्या वर्षांभरांपासून वाढत चाललेल्या महागाईची झळ मुंबईतील प्रसिध्द असलेल्या वडापावलासुध्दा बसली आहे. महागाईमुळे मुंबईचा वडापाव २ ते ३ रूपयाने महागला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला भार सोसावा लागत आहे. यामुळे १२ रुपयांचा वडापाव आता १५ रुपयांपर्यंत पोहचला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगातील सर्व देशांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. युक्रेन आणि रशियासह श्रीलंका, पाकिस्तान, पाश्चात्य देशांसह भारतात महागाई वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होणे साहजिक आहे. मुंबईतल्या सर्वसामान्यांचे जगणे असलेला वडापावदेखील आता महाग झाला आहे.

जाहिरात
देशात खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम मुंबईतील सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ वडापाववरही झाला आहे. रुस-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत वडापावचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत प्रत्येक गल्लीत वडापाव मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र, आता पूर्वीच्या किमतीत वडापाव विकता येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कारण तेल, मिरची आदी सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. यामुळे महगाईचा भडका आणखी होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे,