मुंबई
बोरिवलीत सायकल, चित्रकला स्पर्धा संपन्न
आ.प्रकाश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी, १७ एप्रिल रोजी शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेविका रिध्दी खुरसंगे यांच्यावतीने बोरिवली काजूपाडा, अभिनव नगर याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सायकल आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रकाश सुर्वे, विभाग प्रमुख आमदार विलास पोतनिस, माजी नगरसेविका रिध्दी खुरसंगे आणि माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सायकल स्पर्धे १०० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे तीन ग्रुप करून सायकल स्पर्धा जिकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चित्रकला स्पर्धेत २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
