टाॅप न्यूज

उपनगरांत आंबेडकर जयंती दणक्यात साजरी

पश्चिम उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्र्वरी, अंधेरी ते पार वांद्रेपर्यंतच्या आंबेडकरी वस्त्यांमध्ये महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोविंडच्या प्रादुर्भावामुळे महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात येत होती,परंतु आता कोरोना प्रादुर्भाव ओसरल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटविले. यामुळे यंदाची डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर धूमधडाक्यात साजरी झाली. मुंबईसह उपनगरांतही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी दणक्यात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी पांढरी शुभ्र साडी तर पुरुष आणि तरुणांनी पांढरे वस्र परिधान केले होते. तसेच संपूर्ण आंबेडकरी वस्त्यांमध्ये निळ्या पताका, लाईटिंग आणि निळे झेंडे लावण्यात आले होते. यामुळे जणूकाही आंबेडकरी वस्त्या निळ्या रंगाने नाहूण निघाल्याच्या दिसून आल्या.
कांदिवली पुर्वकडील दामूनगर, भिमनगर या आंबेडकरी बाल्लेकिल्यामध्ये रथामधून डाॅं.बाबासाहेब यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत बाबासाहेबांच्या गाण्यावर तरुण – तरुणींनी डीजेवर ठेका धरला होता. या मिरवणूकीत आंबेडकरी तरूण – तरुणींनी उर्त्स्फूपणे सहभागी झाले होते. मिरवणूकीत भीमसैनिकांना विभागातील मुस्लिम तरुणांनी सरबत, पाणी वाटप केले. 
सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी –
उपनगरांतील दहिसर, कांदिवली, सांताक्रुझ, अंधेरी याठिकाणी सामाजिक उपक्रम घेवून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये आरोग्य शिबिर, एक वही- एक पेन अर्पण करणे, प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करणे अशाविविध उपक्रमाने डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close