सामाजिक

दहिसरमध्ये जयंत पाटील अन्नधन्य वाटप सुरक्षा कवच योजना

भारतरत्न डाॅं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दहिसर पूर्व वार्ड क्रमांक २ येथे ज्या कुटुंबामध्ये कर्ता व्यक्ती नाही, अशा निराधार कुटुबियांना दरमहा प्रत्येक १४ तारखेला मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जयंत पाटील अन्नधन्य वाटप सुरक्षा कवच नावाची  योजना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहिसर तालुकाध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरु केली आहे.
या योजनेची सुरुवातीला १४ एप्रिल रोजी डाॅं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी वार्ड क्र.२ मधील ५२ कुटुंबियांना गहू, तांदूळ, साखर, तूर डाळ आणि तेल आदी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून करण्यात आली. सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे दहिसरचे युवकांचे तालुकाध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले. कोरोना सुरु झाल्यापासून गेली दोन वर्ष हरीश गायकवाड यांच्या नेतृत्वात वार्ड क्रमांक २ मध्ये जनतेला उपयुक्त असलेले बरेचशे कार्यक्रम करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close