मुंबई

कांदिवलीत भव्य श्रीराम यात्रा मिरवणूक

राम नवमीनिमित्त कांदिवली पुर्वकडील विभागात समाजसेवक तथा शिव प्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण साळुंखे यांच्यावतीने भव्य राम यात्रा काढण्यात आली होती. यावेळी श्री राम, हनुमान यांची वेशभुषा घातलेले बालक सहभागी होते. तसेच श्रीरामाच्या गाण्यावर तरूणांचा भर उन्हात जयघोषामध्ये ठेका धरला होता. सदर मिरवणूक कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, जानूपाडा, सिंग इस्टेट, लोखंडवाला, हनुमाननगर या परिसर जय श्रीरामाच्या जय घोषाने दणाणला होता.  
 येथील वडारपाडा याठिकाणी हनुमान मंदिरालगत श्रीरामाची भव्य अशी पुतळा ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून कांदिवली विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर, भाजपा सचिव अॅड.आखिलेश चौबे, अभिनेत्री निशा परूळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे आयोजक सचिन नांदगावकर, विनोद शिंगे, सुशील गुंजे, हेमंत मकवाना यांनी केले होते.
या उत्सवात सकाळी श्रीराम यात्रा, दुपारी महाआरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कांदिवली पुर्वकडील विभाग रविवारी भगवामय झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close