मुंबई

प्रलंबित सेवा विषयक मागण्यासाठी नायब तहसिलदारांचे धरने आंदोलन

अन्य खात्यात सात आठ वर्षात पदोन्नती मिळत असताना, नायब तहसीलदारांना इतर वर्ग दोन राजपत्रित अधिकाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे मिळावा, या मागणीसह उर्वरित सर्व मागण्यासाठी शुक्रवारी तहसिलदार आणि नायब तहसिलदार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरने आंदोलन केले.

मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना (मुख्यालय मुंबई उपनगर) तर्फे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी  नायक तहसिलदार सर्वंगाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे, नायब तहसिलदार संर्वगातून सन २०११ पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे, नायब तहसिलदार सर्वंगातून तहसिलदार व तहसिलदार सर्वंगातून उपजिल्हाधिकारी सर्वंगात पदोन्नती करणे, कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबित प्रस्ताव, परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव, स्थायीत्व प्रमाणापत्र बाबतचे प्रस्ताव व सेवाजोड प्रस्ताव निकाली काढणे इत्यादी बाबीसाठी तहसिलदारांनी धरने आंदोलन केले. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास १८ एप्रिल रोजी सर्व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी रजा घेवून विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी आंदोलनात कोकण विभाग संघटनेचे उपाध्यक्ष पवन चांडक , निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपजिल्हाकारी वंदना गेवराईकर, अजित साखरे, तहसिलदार सचिन भालेराव, विनोद धोत्रे, दिनेश कुराडे, नायब तहसिलदार हनुमंत जगताप, किरण अंबुर्ले, मंजुषा रसाळसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close