राजकिय

महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी मुख्यमंत्रीपद मागितले तर आश्चर्य वाटायला नको; आ. दरेकर

जेव्हा तीन पक्ष एकत्रित येतात, तेव्हा समान खातेवाटप, समान न्याय, समान निधी याची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावर झालीयत. सुरुवातीला भले घोषणा केल्या असतील. उद्धवजी ५ वर्षे मुख्यमंत्री राहतील, परंतु आता इतर पक्षांच्या मनातील सुप्त भावना निश्चितच बाहेर येतील. आणि गृहमंत्री पदासारखे महत्वाचे पद मागतील, त्या वेळेला सौदेबाजी सुरू होईल आणि त्या वेळेला इतरांनी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद मागितले तर आश्चर्य वाटायला नको, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
 दरेकर यापुढे म्हणाले की, व्यक्तिद्वेष आणि तिरस्काराच्या भूमिकेतून सरकार वेळ घालवतेय. गृहखाते तुमच्याकडे आहे की माझ्याकडे यासाठी १-१, दीड-दीड तास घालवत असताना आज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलीय. अनेक नागरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न आहेत. यासाठी एक तास-दीड तास चर्चा झाल्याचे आठवत नाही.
राज्यात महिलांवर अत्याचार होतायत. चोऱ्या, दरोडे वाढलेयत. यांवर कधी दीड-दोन तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचे माहीत नाही. सरकार केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी काम करतेय. तुला खुर्ची की मला खुर्ची यासाठीच हे सरकार जन्माला आलेय का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण सर्वसमान्याना कोणते खाते कोणाकडे आहे, याच्यात काडीचा रस नाही. त्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला काय देता, प्रश्न कसे सोडवता हे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने ते होताना दिसत नाही.
जाहिरात
दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री किंवा शिवसेनेला हवे ते करत नाही. संजय राऊत राणा भीमदेव थाटात घोषणा करतात. आरोप करतात. हे आत जातील, ते आत जातील. त्यांच्या मनासारखे होत नाही. म्हणून काहीही करा पण कारवाई करा या एकाच उद्देशाने पछडून अशा प्रकारची गोष्ट जर सुरू असेल तर ते चांगले नाही. राष्ट्रवादी गृहखाते कशासाठी देईल? आणि समजा जर ते दिले, तर उद्या अडीच वर्षे झालीयत म्हणून मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या, अशी मागणी पुढे येऊ शकते. आणि तीन पक्ष तीन दिशांना पळताना दिसतायत आणि हा विस्फोट उद्या,  परवा झाल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close