टाॅप न्यूज
आता विनामास्क नागरिकांना दंड करण्यास पोलीसांना अधिकार नाही

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न परिधान केलेल्या नागरिकांवर आता मुंबई पोलीसांना दंड आकारता येणार नाही. असे परिपत्रक मुंबई महापालिका कार्यकारी अभियंता (घकव्य) परिमंडळ -३ यांनी काढले आहे. यामुळे यापुढे मुंबईत विना मास्क फिरणा~या नागरिकांवर आता मुंबई पोलीसांकडून २०० रूपयेची दंडात्मक कार्यवाहीला चाप बसला आहे.
महापालिका आयुक्त यांनी एमजीसी/२८८८ दि.१९/०२/२०२१ अन्वये सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा~या नागरिकांवर २०० रूपयचे दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकारी मुंबई पोलीस यांना प्रधान करण्यात आले होते. मात्र वरिल अधिकार दि. १ मार्च २०२२ पासून संपुष्टात येत आहे. यामुळे १ मार्चपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा~या नागरिकांवर मुंबई पोलीस यांच्याकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई विनाविलंब थांबवावी. तसेच पालिकेकडून पोलीसांना देण्यात आलेली दंडाची पावती पुस्तके परत करावीत. आणि दंडात्मक कारवाई केलेल्या रक्कमेचा भरणा महापालिकाकडे करावा, असे सांगण्यात आले.
