
नॅशनल पार्कपासून २५ किमी अंतरावर असलेल्या गोराई गावात गेल्या काही दिवसांपासून आदिवासी पाड्यात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे रात्री खाडीमध्ये खेकडे पकडण्यास जाणा~या आदिवासींची सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांनी गोराई खाडीतील खेकडे पकडणे बंद केल्याने त्यांना उदारनिर्वाह करणे मोठे जिकीरिचे झाले आहे. नॅशनल पार्क प्रशासनाकडून रात्री खेकडे पकडण्यास न जाण्याचे आवाहन केले आहे. यामुळे येथील आदिवासी पाड्यातील आदिवासीबांधव सध्या घरी बसून आहेत.
आरे काॅलनीप्रमाणे गोराई गावातसुध्दा आदिवासी पाड्यात आहेत. यामध्ये मोठी डोगंरी, छोटी डोगंरी, बाबर पाडा, मुडां पाडा, बोरकरवाडी, मांटण पाडा, जामझाड पाडा असे सात आदिवासी पाड्यात आहेत. या पाड्यातील आदिवासीचा रोजगार हा खेकडे पकडणे आहे. तसेच रात्रीच्यावेळी खेकडे खाडीत बाहेर येत असल्याने शक्यतो आदिवासी रात्रीच्यावेळी खेकडे पकडण्यास जातात. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी गोराई खाडीत बिबट्याचा वावर वाढल्याने आदिवासीना रात्री खेकडे न पकडण्यास पोलीस आणि वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. यामुळे येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांसमोर उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोराई गावातील मोठी डोगंरी ईथे राहत असलेल्या राजु सालकर व लक्ष्मी सालकर यानां रात्री 9:30 वाजेच्या सुमारांस खेकडे पकडतांना प्रत्यक्ष दिसला. यामुळे घाबरलेले सालकर यांनी गावातील इतरांना फोन करून माहिती दिली. यानंतर येथील डाडें बॅटरी घेवून त्याना खाडीतुन घेऊन आले. त्यानंतर आदिवासी समाजातील समाजसेविका सुषमा दवडे यानी गोराई गावातील पोलिसांना माहिती दिली. आणि गोराई पोलीस ठाण्यातील अधिकारी नरोटे, ताबें, शिदे व स्टाफ यानी त्वरीत दखल घेऊन वनविभाग येथे तक्रार करुन वनविभागचे अधिकारी बोलवून आदिवासीबांधवाच्या मनातील भीती काढण्यसाठी मुंबई रेजंचे वनपाल रामा भागंरे, रेस्क्यू टिमचे रविंद्र तवर, वनरक्षक राम केंद्रे, वन जमिनी अभ्यासक निकीत सुर्वे तसेच गोराई पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि सुषमा दवडे व आदिवासी बांधव उपस्थित राहुन लोकाच्या मनातली भीती काढली आहे व जिथे तिथे कॅमेरे लावून लोकांची जनजागृती करण्यात आली.