राजकिय

मंडपेश्र्वर मेट्रो स्थानकाचे नार मंडपेश्र्वर-आयसी काॅलनी तर पहाडी एक्सरचे शिंपोली होणार

शिवसेनेच्या दणक्यानंतर झाले नामांतरण

बोरिवली पश्चिमेकडील मंडपेश्वर मेट्रो स्थानकाचे नाव आता (मंडपेश्वर-आय सी कॉलनी) तर पहाडी-एक्सर मेट्रो स्थानकाचे नाव आता शिंपोली मेट्रो स्थानक करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी शुक्रवारी
एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवासन यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर श्रीनिवासन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देशही दिले .याप्रसंगी मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते. यापूर्वीही शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या दणक्याने दहिसर पूर्वेकडील अप्पर दहिसर मेट्रो स्थानकाचे नाव आनंद नगर असे करण्यात आले होते.
 दहिसर प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी स्थानिक जनतेच्या मागणीनुसार मंडपेश्वर मेट्रो स्थानकाचे नाव मंडपेश्वर आय सी कॉलनी करण्याची मागणी शिवसेना नेते, व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. तर पहाडी एक्सर स्थानकाचे नाव बदलून त्या स्थानकाला शिंपोली नाव देण्याची मागणी गावदेवी ग्रामस्थ मंडळाने केली होती. याबाबत ग्रामस्थ मंडळाने घोसाळकर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार ही मागणी कायम ठेवत पहाडी एक्सर स्थानकाचे आता शिंपोली असे नामकरण करण्यात येणार आहे.
 मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 3 दहिसर पूर्व डी एन नगर अंधेरी या मेट्रो मार्गातील प्रभाग क्रमांक 1 मधील मेट्रो स्थानकाला मंडपेश्वर असे नाव देण्यात आले होते. वास्तविक पाहता या ठिकाणाहून मंडपेश्वर विभाग 3 किलोमीटर दूर असून हा परिसर आय सी कॉलनी म्हणून ओळखला जातो. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी हे निदर्शनास आणून देत या स्थानकाचे नामकरण मंडपेश्वर-आयसी कॉलनी करण्याची मागणी केली होती तसेच शिंपोली या गावाला इतिहास असून भारतीय राजपत्रात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान मेट्रोचे काम सुरू असताना येथे पहाडी एक्सर असा फलक लावण्यात आल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा आमच्या अस्तित्व तसेच अस्मितेचा प्रश्न असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close