राजकिय

दहिसरमध्ये गरजू महिलांना अन्नधान्याचे वाटप

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक पार्टीचे दहिसर तालुका अध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांच्यावतीने दहिसरमधील विभागातील ११०० गरजू महिलांना साडी वाटप आणि ५०० गरजू कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात आले. हरीश गायकवाड यांनी एप्रिल कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून वार्ड क्र – २ मधील आनंद नगर, संभाजी नगर, शिवनेरी नगर, बाबली पाडा, बालाजी नगर, शक्ती नगर, अवधूत नगर तरे कंपाऊंड या विभागात औषध वाटप धान्य व साडी वाटप, सोसायटी आणि चाळींमध्ये सॅनिटायझर फवारणी, तसेच बाबली पाडा, शिवनेरी नगर महाकाळ वाडी येथे सीसीटीव्हीचे कॅमेरे व पथदिवे लावली. यामुळे नागरिकांना रात्री- अरात्री घरी जाण्यास सुरक्षित वाटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close