टाॅप न्यूज

मुंबई बॅंकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; उपाध्यक्ष पद भाजपाच्या पारड्यात

 

मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याचं झालेल्या मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनलने बाजी मारलेली असतांना आता मात्र चक्र उलटे फिरले आहे. मुंबैवर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचेे सिध्दार्थ कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतलं एक मत फुटल्याने समसमान निकाल लागला. यामुळे ईश्र्वर चिठ्ठीने भाजच्या विठ्ठल भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले.
मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेवर आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष असावा, यासाठी पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये गुप्त चर्चा झाली असून बॅंकेवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष शिवसेना पक्षातील असेल तसे सूत्र ठरले होते. मात्र महाविकास आघाडीचे एक मत फुटल्याने उपाध्यक्ष पद भाजपाच्या पारड्यात गेले. निवडणुकीत विजयी अध्यक्ष आणि संचालकांनी आज शिवसेना पक्ष सचिव तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. यामुळे दिवसभर मुंबईतील सहकार क्षेत्रामध्ये एकच चर्चा रंगली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close