मुंबई

वनिता फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजकता विकास व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन 

मुंबई : प्रतिनिधी
 विक्रोळी पूर्व येथे वनिता फाउंडेशन ,महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन  यांच्या संयुक्त विद्यमाने निराधार गरीब गरजू व त्यांचे पती कोरोनामुळे निधन झालेले आहेत अशा महिलांसाठी महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिलासाठी एक दिवसीय महिला उद्योजकता विकास  व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व येथे करण्यात येणार असल्याचे वनिता फाऊंडेशनचे संस्थापक प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
 या कार्यक्रमामध्ये महिलांना नवउद्योजक  बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा या. ज्योती ताई ठाकरे वर्ल्ड ट्रेड सेंटर चे मानद सल्लागार जयेश खडे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदेश शिरसाट प्रभारी सहाय्यक आयुक्त नितीन पाटील , मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोइर, आय सी.. डी . एस. प्रकल्पाच्या नंदिका काळभोर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असून विविध शासकीय योजना व अनुदान संबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहेत महिलांना घरबसल्या व्यवसायांच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याचे फॉर्म किंवा कर्जा संबंधी बिन भांडवल व्यवसाय कसा करता येईल याची सविस्तर चर्चा करण्यासाठी तसेच व्यवसाय कसा करावा त्याचे शाब्दिक मार्गदर्शन न करता प्रॅक्टिकली मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  काही लोकांना मोफत कार्पोरेट गिफ्ट भेटवस्तू व घरबसल्या फेसबुक व व्हाट्सअप वर आपला व्यवसाय करण्यासाठी  बँकेमार्फत तसेच घरातून व मित्र परिवाराकडून फंड कसा गोळा करावा त्यासंबंधी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामध्ये काही प्रोडक्ट मोफत आणि 50 ते 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
 ज्या महिला कडे काही प्रॉडक्ट असतील त्यांचे सॅम्पल दाखवून त्यांच्या बिझनेस चे प्रमोशन करण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी कुणाला भाग घ्यायचा असेल तसेच जाहिरात  व स्पॉन्सरशिप करायचे असेल त्यांनी 8828010102//8425899043 या फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे व जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहनही प्रभाकर कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close