मुंबई

अदानीकडून भारतातील सर्वात मोठी आंतर-राज्य पारेषण मार्गिका कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमध्ये कंपनीची ७६५ केव्ही व ४०० केव्हीची ८९७ सर्किट कि.मी.ची लांबलचक पारेषण मार्गिका अस्तित्वात अदानी ट्रान्समिशनच्या परिचलन आणि कार्यरत बांधकाम मालमत्तेत १८,३०० सर्किट कि.मी.हून अधिक भर शुल्काधारित स्पर्धात्मक बोली (TBCB) प्रकल्पाधारित कंपनीचा हा सर्वात मोठा आंतर राज्य   प्रकल्प ठरला आहे. उत्तर प्रदेशमधील ४००केव्ही डी/सी ट्विन मूसच्या ९८ सर्किट कि.मी. आणि ७६५केव्ही एस/सी  उच्च क्षमतेच्या क्वाड बर्सिमिसच्या ७९९ सर्किट कि.मी.च्या मार्गिकेचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
अदानी ट्रान्समिशनची (ATL) उपकंपनी घाटमपूर ट्रान्समिशन लि. (GTL) द्वारे प्रकल्पासाठी पावर फायनानन्स कॅर्पोरेशन आफ इंडिया (PFC) आणि आरईसीकडून (REC) यशस्वी कर्ज उभारणी अदानी ट्रान्समिशन (ATL) वर्ष २०२२ पर्यंतच्या २०,००० सर्किट कि.मी.च्या लक्ष्यासमीप अहमदाबाद, २१  डिसेंबर २०२१ भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी वीज पारेषण आणि किरकोळ वितरण कंपनी आणि अदानी समूहातील अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) ने ८९७ सर्किट कि.मी.च्या भारतातील सर्वात मोठ्या आंतर-राज्य पारेषण मार्गिकेचा प्रकल्प तडीस नेला आहे. अदानी ट्रान्समिशनची उपकंपनी घाटमपूर ट्रासन्समीशनच्या साहाय्याने उत्तर प्रदेशमध्ये हे लक्ष्य पूर्ण करण्यात यश आले आहे.
आग्रा, ग्रेटर नोएडा आणि हापूर येथील विस्तारित ७६५ केव्ही आणि ४०० केव्हीच्या चार पारेषण मार्गिकांचा या नव्या प्रकल्पात समावेश आहे. बांधा, वापरा तसेच परिचलन आणि देखभाल तत्त्वावर खासगी-सार्वजनिक भागीदारीद्वारे हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पुढील ३५ वर्षांसाठी दिर्घकालीन पारेषण वापरकर्त्या ग्राहकांकरिता हा प्रकल्प पारेषण सुविधा देईल.
अदानी ट्रान्समिशन लिमटेडचे (ATL) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल सारदाना याबाबत म्हणाले की, “अदानी ट्रान्समिशन ही भारतातील ग्रीड नेटवर्कमधील एक महत्त्वाची कंपनी आहे. वैश्विक कोविड साथ आजारसारख्या आव्हानात्मक कालावधीतही हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे ही एक उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राष्ट्र उभारणीतील कंपनीचे योगदान आणि भागधारकांसाठी दिर्घकालीन शाश्वत मूल्यनिर्मितीतील जागतिक दर्जाचे नेतृत्व याबाबतची कंपनीची वचनबद्धताच यातून सिद्ध होते. विशेषत कानपूर, आग्रा, ग्रेटर नॅएडा आणि हापूरसारख्या भागात उत्तर प्रदेशच्या ऊर्जा यंत्रणेचे जाळे अधिक भक्कम करण्यासह या प्रकल्पामुळे विश्वासार्हता, परिचलन कार्यक्षमता सुधारण्यासाठी साहाय्यभूतता ठरेल. यामुळे केंद्र व राज्य सरकारचे सर्वांसाठी `२४तास ऊर्जा` या ध्येयासाठीही पाठबळ मिळेल.
कंपनीच्या या प्रकल्पाला भारताच्या उत्तर भागातील ऊर्जा पद्धती नियोजनाबाबत आयोजित ३६व्या स्थायी समिती बैठकी दरम्यान केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मान्यता दिली. हा प्रकल्प कार्यान्वित होत असल्याने परिसरातील नागरिकांचे सामाजिक जीवनमान उंचावेल. प्रकल्पाच्या माध्यमातून नेवेली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेड (नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम यांच्यातील संयुक्त उपक्रम) च्या मालकीच्या घाटमपूर टीपीएस मधून 3x660MW वीज येईल आणि उत्तर प्रदेशच्या पारेषण जाळ्यात पोहोचेल.
यामध्ये ७६५ केव्ही एस/सी च्या ४११ कि.मी. घाटमपूरहापूर पारेषण वाहिनीचा समावेश आहे. ती देशातील मोठ्या एचव्हीएसी पारेषण वाहिनीपैकी एक आहे. ते घाटमपूर टीपीएस (मध्य उत्तर प्रदेश) ७६५/४०० केव्ही हापूर सबस्टेशन (पश्चिम उत्तर प्रदेश) ला जोडले जाणार आहे. नागरी भागातील अत्यंत खडतर मार्गातून पारेषण मार्गिका आहे तसेच अत्यंत ओबड-धोबड नाले परिसरातून ती आहे. जीटीएलने मागे टाकलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोविड साथ आजार कालावधीत मनुष्यबळाची उपलब्धतता पाहता जीटीएलने मोठे आव्हान पार केले आहे. कंपनीने जागतिक दर्जाची गुणवत्ता, परिणामक प्रकल्प व्यवस्थापन आणि सर्व सुरक्षाविषयक उपाय योजून तसेच कोविड प्रतिबंधनात्मक नियम पाळून हा प्रकल्प पूर्ण केला आहे.
हा प्रकल्प पूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर उत्तर प्रदेश आष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि नेयवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन मिळून दरवर्षी १४,००० दशलक्ष यूनिट (MU) ऊर्जानिर्मिती होईल. यामुळे राज्याची भविष्यातील वीज मागणी पूर्ण होईल. अदानी ट्रान्समिशन या औष्णिक ऊर्जा केंद्रातून राज्याच्या अनेक भागांमध्ये कार्यरत असलेल्या पाच वीज वितरण कंपन्यांद्वारे वीज पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याचा लाखो कुटुंबांना,  कृषी तसेच उद्योग क्षेत्र, व्यावसायिकांना लाभ होईल. यामुळे देशाच्या अर्थवृद्धीलाही प्रोत्साहन मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close