शैक्षणिक

उद्यापासून मुंबईतील १ ते ७ वी च्या शाळा सुरु

पालकांच्या संमतीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील १ ते ७ वी पर्यंतची शाळा उद्यापासून, बुधवार (ता.१५) डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. असे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाने दिले. शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. पालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संमतीनुसारचं विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. असे आदेश मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी आदेश जारी केले आहेत. दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला होता.

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या मुंबईच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. मागच्या महिन्यात कोरोना नियंत्रण आटोक्यात आल्यामुळे राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला होता. परंतु ओमिक्रॉनच्या भितीमुळे मुंबई महापालिकेकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

आता मुंबईतील शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरू केल्या जाणार असून या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या शाळांना याबाबत महिती मिळाली नाही, त्या शाळांना पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी मंगळवारी सकाळी शाळा सुरू करण्याबाबत एक आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये काही राहिलेल्या त्रुटींसंदर्भात तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले.

यावेळी महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी म्हणाल्या की, शाळेमध्ये येण्यास कुठल्याही विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली जाणार नाही.  ज्या पालकांनी शाळेला समंती प्रमाणपत्र दिले आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. तसेच ज्यांनी ते दिले नाही, त्यांना घरी बसून आॅनलाईन शिक्षण घेता येईल. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी शाळेतील वर्गखोलीमध्ये एका बॅचवर एकच विद्यार्थी बसेल. याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर बाॅटलचे वाटप करण्यात येणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close