मुंबई

बोरिवलीत तौक्ते चक्री वादळात पडझड झालेल्या मंदिराचा जीर्णोध्दार

आ.प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रतिनिधी
बोरिवली पश्चिमेकडील न्यू एम.एच.बी कॉलनी येथे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वाडेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्टचे शिवमंदिर आहे. गेल्यावर्षी तौक्ते वादळात या मंदिरावर वडाचे झाड पडल्याने पडझड झाली होती. यानंतर आ.प्रकाश सुर्वे यांनी यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचे ठरवले होते. त्यांचा रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते महादेवाची पूजा संपन्न झाली.  
हे मंदिर परिसरातील सुमारे २५ हजार भाविकांसाठी मोठ्या आस्थेचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. हजारो नागरिक, भाविक, वृद्ध या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक या मंदिराशी जोडले गेले आहेत. कोरोनाच्या काळात सुमारे दीड वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या भाविकांनी सर्व नियमांचे पालन केले. आज हे मंदिर एका नव्या रुपात समोर येत आहे, ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब असल्याचे आ.सुर्वे म्हणाले.
यावेळी कोरोना काळात संपूर्ण राज्याची काळजी घेतल्याने आजपासून पुढील दोन दिवस या मंदिरात २१ ब्राम्हणांच्या साक्षीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महा मृत्युंजयमंत्राचे आयोजन केले आहे. याप्रसंगी वाडेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्टने या मंदिराच्या जीर्णोद्धाराला मोलाचे सहकार्य केल्याबद्धल उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील केला. कार्यक्रमाला आ. विभागप्रमुख विलास पोतनीस, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी, ज्युनिअर मिस्टर इंडिया राज प्रकाश सुर्वे, वाडेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट मंदिराचे महेश सरफरे, महेंद्र म्हात्रे, राजासिंग नाडर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close