मुंबई
मुंबईकरांच्या आरोग्यासाठी भाजपाची हेल्पलाईन; नगरसेवकांची विशेष समिती

मुंबई : प्रतिनिधी
नायर रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने एका दुर्दैवी बालकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना तातडीने आरोग्यविषयक सेवा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांची विशेष समिती स्थापन करण्यात आली. यासाठी विशेष सेवा सेतू (91- 8591244742) हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य विषयक अडचणी सोडविण्यासाठी समितीतील सदस्य प्रयत्न करतील.
मुंबईकरांना आरोग्यविषयक मदतीसाठी पूर्व उपनगराकरिता नगरसेविका बिंदू त्रिवेदी, सारिका पवार, अनिता पांचाळ, नगरसेवक प्रकाश मोरे तर शहरसाठी नगरसेवक नील सोमय्या, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, राजुल देसाई, उपनगराकरिता नगरसेविका प्रियांका मोरे, बिना दोषी, सुनीता मेहता, योगिता कोळी, मुमताज खान या उपलब्ध असतील,असे भाजपाने प्रसिध्द केले.