राजकिय

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल; खा.आठवले

मुंबई : प्रतिनिधी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देण्यात येईल. तसेच रिपब्लिकन पक्षाने एकदा उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी  जिद्दीने काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. सांताक्रूझ पूर्वेतील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाची मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी  महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी ना. आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसा आई आठवले यांच्या चौथ्या स्मृतिदिना निमित्त अदारांजली वाहण्यात आली. तसेच भीमछाया केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या डॉं. माईसाहेब आंबेडकर सभागृहाच्या नुतनीकरणाचे उदघाटन खा. आठवले यांच्या हस्ते झाले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व जाती धर्मियांना, तसेच गुजराती हिंदी सह सर्व भाषिक आणि सर्व प्रांतियांना रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देणार आहे. जिथे भाजपचा निवडून आलेला नगरसेवक आहे ते वॉर्ड वगळून इतर वॉर्डमधील जिंकू शकणाऱ्या 50 जागा  भजप पुढे ठेवण्यात येतील. त्यातील ज्या जागा आरपीआयला सुटतील त्या जागा ताकदीने लढवून जिंकून आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यानी  प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. 
रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहीम यशस्वी करून पावती बुक जमा करावे असे आवाहन  यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष  गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी रिपाइंचे  सुरेश बारशिंग, मुस्ताक बाबा, विवेक पवार, रमेश गायकवाड, प्रकाश जाधव, सुमित वजाळे, अभयाताई सोनवणे, रतन अस्वारेसह रिपाइंचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close