टाॅप न्यूज

बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी; २६/११ हल्ल्यातील शहीदांच्या समर्पित

शिवानंद शेट्टी यांची संकल्पना

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आंदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मनार्थ बोरिवलीत १५०० चौ.फूटांची रांगोळी काढण्यात आली. नाशिक येथून आलेली रश्मी विसपुते या तरुणीने तब्बल दीड दिवस अथक मेहनत घेवून १५०० फूटांच्या रांगोळीतून तिने वीर जवानांना आदरांजली वाहिली. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्दघाटन बोरिवली पश्चिमेकडील आचार्य नरेंद्र विद्या मंदिरच्या प्रांगणात खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनिल राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन आणि संकल्पना माजी नगरसेवक तथा भाजपा मुंबई सचिव शिवानंद शेट्टी यांची आहे. सदर प्रदर्शन हे १३ ते २६ नोव्हेबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आले आहे. यावेळी महापुरुषाच्या प्रतिमेच्यासुध्दा रांगोळ्या काढण्यात आल्या असून त्याही यावेळी पाहण्यास मिळणार आहे. तसेच २६ नोव्हेबर रोजी शहीद जवानांना एक हजार दिव्यांच्या माध्यमांतून विनम्र अभिवादन केले जाणार असल्याची माहिती आयोजक शिवानंद शेट्टी यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close