राजकिय

माजी नगरसेवक निकलोस अल्मेडा यांचा मनसेत प्रवेश

मनसेला मिळाला नवीन चेहरा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणूक दोन ते तीन महिन्यावर येवून ठेवल्याने आता राजकिय पक्षात इनकमिंग आणि आऊंट गोईंग सुरू झाले आहे. गुरुवारी अंधेरी पुर्वकडील सहार गाव विभागातील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रचलित असलेले निकलोस अल्मेडा यांनी गुरुवारी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज या त्यांच्या निवास्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. यामुळे अंधेरी पुर्वकडील उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये मनसेला नवा चेहरा मिळाला. या पक्ष प्रवेशावेळी मनसे सरचिटणीस नयन कदम, रोहण सावंत, बंटी सांगळे, रोहण खेतलसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


अल्मेडा यांचा सहार गाव, विमानतळ, कार्गो यासह इतर विभागात मोठा जनसंपर्क आहे. यामुळे पालिका निवडणुसाठी मनसेने अल्मेडा यांना रिंगणात उतरल्यास त्यांचाा मनसेला नक्कीच फायदा होवू शकतो, यामुळे सध्या सहार गावातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेना, भाजपा आणि काॅंग्रेस पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. अल्मेडा यांच्याविरोधात या राजकिय पक्षाकडून तरूण चेहरा शोधण्याची मोहिम सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे येत्या महापालिका  निवडणुकीमध्ये सहार गावातील निवडणूक चूरशीची होणार असल्याचे चित्र आताचं दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close