साहित्यिका समाजसेविका, सुरेखा बेंद्रे शब्द क्रांती पुरस्काराने सन्मानित..

author
0 minutes, 0 seconds Read

संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवयित्री तसेच काळीज माझं साहित्य सामाजिक संस्थांच्या अध्यक्ष व काळीज प्रकाशनाच्या संचालिका जेष्ठ समाजसेविका सुरेखा बेंद्रे यांना नुकताच पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात साहित्यातील क्षेत्रातील कार्यासाठी शब्द क्रांती हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरेखा बेंद्रे यांच साहित्य बरोबरच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. विधवा महिलांसाठी हळदीकुंकू आणि साडीचोळी वाटप करण्यात त्यांनी पुढाकार घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. विधवांना समाजात मान मिळवून देण्यासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत.
तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप काळीज माझं साहित्य सामाजिक संस्थांच्या वतीने सुरेखा बेंद्रे या करतं असतात.
निराधार निराश्रित लोकांसाठी केलेलं कार्य वाखाणण्याजोगे आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मा. चंद्रकांत दादा वानखेडे यानी या पुरस्कारा साठी त्यांची निवड केली गेली त्यांना आता पर्यंत विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार त्यांना मा. सतसिंग मोखा,प्रसिद्ध उद्योगपति श्रीकृष्ण गोबल,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्रीमती माधुरी ओव्हाळ, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे, डॉ. विजय ताम्हाणे (नेत्र रोगतज्ञ)प्रदीप् पाटील ( शिवव्याख्याते) श्री गुलाबराजा फुलमाळी हे मान्यवर उपाष्ठित होते देेशातील विविध ठिकाणाहुन विविध माध्यमातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *