आरोग्यमुंबई

कांदिवलीत कोरोना योध्दांचा सत्कार

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने मोठी कामगिरी साध्य केली असून आज लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा केवळ २७३ दिवसांत पार करून विश्वविक्रम केला आहे. या निमित्ताने भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालय लसीकरण केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात १०३ कोरोना योद्धे व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १०० फुगे आकाशात सोडत सर्वांनी हा सुवर्णक्षण साजरा केला.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत केली. तसेच अत्यंत कमी काळात देशभर आरोग्य सुविधा उभारुन शास्त्रज्ञ व डॉक्टरांना आर्थिक व प्रशासकीय मदत देत केवळ ४ महिन्यांच्या काळात लस शोधली. आतापर्यंत १०० कोटी लोकांचा पहिला आणि दुसरा लसीकरणाचा टप्पा पुर्ण झाला असून डिसेंबर अखेरपर्यंत भारताची लस उत्पादन क्षमता २०० कोटी इतकी होणार आहे. त्यामुळे भारतात संपूर्णपणे लसीकरण पूर्ण होण्यासोबतच जगातील १५० देशांना भारत लसींचा पुरवठा करणार असल्याचा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
यावेळी कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नायर, डॉ. छेडा, नगरसेविका सुनिता यादव, भाजपा पदाधिकारी राणी द्विवेदी, आप्पा बेलवलकर, सुधीर शिंदे, नितिन चौहान, रवी विश्वकर्मा व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close