टाॅप न्यूज

ज्येष्ठ पॅंथर नेते उमाकांत रणधीर यांचे दुःखद निधन

मुंबई : प्रतिनिधी
पँथर चळवळ ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे ज्येष्ठ पँथर उमाकांत रणधीर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वासनाचा त्रास झाला होता. उपचारासाठी त्यांना न्यू लाईफ नर्सिंग होम, कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथे दाखल केले होते, परंतु डॉ.मुन यांनी त्यांची सेवा घरीच करा असा सल्ला दिला.  त्यांचे बुधवार, (ता.२०) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारांस
राहत्या घरी दु:खद निधन झाले.  मालवणी येथील गेट क्र.६, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हॉल जवळ, विक्रांत क्रीडा मंडळाच्या बाजूला वास्तव्याला होते.
त्यांच्यावर आज गुरुवारी दुपारी १ वाजता चारकोप नाका स्मशानभूमी मार्वे रोड,अस्मिता ज्योती हौसिंग सोसायटी समोर मालवणी मालाड पश्चिम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
या दु : खद घटनाविषयी रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला. तसेच मुंबई अध्यक्ष  गौतम सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य सचिव व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष सुमित वजाळे आणि रिपाई मुंबई चिटणीस रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे आणि रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघा  ज्येष्ठउपाध्यक्ष के.एस. गायकवाड, उपाध्यक्ष भीमराव कांबळे, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघा चिटणीस अर्जुन माघाडे सह रिपाइंच्यावतीने अभिवादन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close