राजकिय

अहमदनगर जिल्हयाचे ञिभाजन करा; भीम आर्मीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
अहमदनगर, महाराष्ट्र राज्यातील सर्वत मोठा जिल्हा म्हणून ओळखला जाणा-या अहमदनगर जिल्हयाचे ञिभाजन करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने केली आहे. यातील एका जिल्हयाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी ही भीम आर्मीचे राज्य प्रमुख महासचिव सुनिल थोरात यांनी केली आहे.
 राज्यातील अहमदनगर जिल्हयाचे संगमनेर, श्रीरामपूर, अहमदनगर अशा तीन भागात विभाजन करण्यात यावे, त्यामुळे या भागाचा मोठया प्रमाणात विकास होईल. अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक दलित अत्याचा-याच्या घटना घडत असतात. त्यामुळे या जिल्हयात जातीअंत नष्ट करण्यासाठी भीम आर्मी ही संघटना जनजागृती करून प्रबोधनात्मक कामे हाती घेईल असा अशावाद ही थोरात यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगरमधील तीन जिल्हयामध्ये विभाजन झाल्याने प्रगती होईल तसेच प्रशासकीय कामकाजात येणा-या अडचणी दूर होतील. अहमदनगर जिल्हयाच्या दौ-यावर सुनिल थोरात हे आल्यानंतर पञकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्ते यांची त्यांनी भेट घेवून संघटनावाढीसाठीचे मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय विश्रामगृहामधे आढवा बैठक संपन्न झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे महासचिव व अहमदनगर जिल्हाचे प्रभारी सूनीलभाऊ थोरात , जिल्ह्याचे मुख्यसंघटक दीपक भलेराव, पापाभाई बीवाल, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना चावरे, सचिव अनिता म्हस्के, दिपाली सोनावणे, मनोज शिरसाठ, शाम जाधव, तालुका पदाधिकारी सर्व कर्यधक्ष मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close