टाॅप न्यूज

महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार

व्यवस्थापकीय संचालकाचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी
महावितरणमधील अतांत्रिक अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेस दिले. संघटनेच्या शिष्टमंडळाने सिंघल यांची मुंबईत ११ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. महावितरणमधील मानव संसाधन, वित्त व लेखा, माहिती तंत्रज्ञान, विधी, औद्योगिक संबंध व जनसंपर्क संवर्गातील अधिकाऱ्यांची  दीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे तातडीने पद्दोन्नतीद्वारे भरणे, वरिष्ठ व्यवस्थापक लेखा व वरिष्ठ व्यवस्थापक मासं या पदांमध्ये झालेली अनियमितता दूर करणे, पूर्वीप्रमाणेच कंपनीतील अंतर्गत लेखापरीक्षणासंबंधी कामे ही वित्त व लेखा विभागातील सी.ए., आय.सी.डब्ल्यू.ए., एम. बी. ए. फायनान्स अशी पात्रता धारण केलेल्या उच्चशिक्षित अधिकाऱ्यामार्फत करून घेण्यात यावी, त्याकरिता अंतर्गत लेखापरीक्षण विभाग पुनर्स्थापित करणे, मानव संसाधन विभागामध्ये देखील पूर्वीप्रमाणेच मासं परीक्षण विभाग (Inspection wing) चालू करणे, माहिती व तंत्रज्ञान विभागातील ऑपरेशन विंग ही सिस्टीम विंगमध्ये विलीन झाल्यानंतर पाळी प्रमुख हे पद समाप्त झाल्यानंतर ४ जून २०११ पासून अनुदेशक या पदावर वेतननिश्चिती करताना अधिकाऱ्यांच्या बाबतीत झालेली अनियमितता दूर करणे इत्यादी प्रलंबित मागण्याकरिता सतत पाठपुरावा केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने चालू होता.परंतु त्यामध्ये सकारात्मक मार्ग निघत नसल्यामुळे शेवटी केंद्रीय कार्यकारिणीने अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.दोन-तीन वर्षांपासून संवर्गनिहाय प्रलंबित अतांत्रिक अधिकाऱ्यांची पदोन्नती पॅनल लवकरच घेण्यात येतील, तसेच सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन सिंघल यांनी दिले.
   सदर बैठकीस प्रशासनाच्या वतीने संचालक मासं भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक मासं अरविंद भादिकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित होते. संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनील पाठक, सरचिटणीस मनोज ठवरे, संघटन सचिव संजय खाडे, सहसचिव धैर्यशील गायकवाड, महिला प्रतिनिधी नमिता गजधर मुंबई झोन अध्यक्ष अजय निकम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close