सामाजिक

कांदिवलीत शौचालयाची अजब काहाणी; खर्च आर.दक्षिणचा, वापरकर्ते पी.उत्तर विभागातील

कांदिवली पालिका आर.दक्षिण विभागाचे शेवटचं टोक असलेल्या लोखंडवाला येथील एका गार्डनमध्ये पालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालय सध्या वादाच्या भव~यात सापडले आहे. गार्डनमध्ये बांधलेले सार्वजनिक शौचालयासाठी पालिका आर.दक्षिण विभागाने खर्च केला असून त्याचा वापरकर्ते मात्र मालाड पी.उत्तर विभागातील नागरिक आहेत. यामुळे स्थानिक नगरसेविकेच्या शिफारसीनुसार बांधण्यात आलेल्या शौचालयाविरोधात आता नेबरहूड सोसायटीतील नागरिकांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बलसिंग चहल यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे सदर गार्डनमधील शौचालयाचे काम थांबविण्याची मागणी नेबरहूड सोसायटीतील रहिवाशांकडून केली जात आहे.
कांदिवली येथील लोखंडवाला, रामगड रस्त्यावरील स्टेप गार्डनमध्ये स्थानिक नगरसेविका सुरेखा मनोज पाटील यांनी २३ जुलै २०२० रोजी दिलेल्या मागणीपत्रानुसार पालिका आर.दक्षिण कार्यालयाने पुढील कार्यवाही करून ९ डिसेंबर २०२० साली कायदेशिर वर्क आॅर्डर काढून १८ सीटर शौचालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. आजच्याघडीला गार्डनमधील शौचालयाचे काम पुर्ण झाले असतांना आता गार्डनसमोरील नेबरहूड सोसायटीतील रहिवाशांनी विरोध सुरु केला आहे. याकडे पालिकेने लक्ष न देता शौचालयाचे काम सुरु ठेवले आहे. यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी सदर शौचालय सुरु होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
गार्डनमध्ये बांधण्यात आलेल्या या शौचालयाचा वापर आर.दक्षिण विभागातील नागरिकांसाठी न होता, तो लगतच्या मालाड पी.उत्तर विभागातील रामगड आणि क्रांतीनगर येथील झोपडपट्टीतील नागरिकांना होणार आहे. तसेच रस्त्यावर पार्किगमधील असलेल्या शेकडो रिक्षाचालकांनासुध्दा या शौचालयाचा लाभ होणार आहे. यांचाच त्रास हा गार्डनसमोरी रहिवाशांना सोमार असल्याचे नेबरहूड सोसायटीचे म्हणणे आहे.
निरोगी आरोग्य आणि शुध्द आॅक्सिजनसाठी नागरिक गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी जातात. मात्र गार्डनमध्ये जर पालिका आणि लोकप्रतिनिधीकडून शौचालय बांधून गार्डनचे विद्रुपीकरण आणि दुर्गंधीकरण केले जात असेल तर सामान्य नागरिकांनी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कुठे जायचे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रुपेश धनावडे यांनी केली आहे.
स्टेट गार्डनमधील शौचालयाविषयी नेबरहूड सोसायटीचा विरोध असले तर सर्वांचा विचार करून योग्य – अयोग्य काय ते पालिका आर.दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त करतील, अशी माहिती नगरसेविका सुरेखा पाटील यांनी दिली.

Related Articles

One Comment

  1. Pingback: buy viagra 25 mg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close