मुंबई

चैत्यभूमीवर उसळला भीमसागर; पहाटेपासूनचं महामानव बाबासाहेबाना अभिवादनास सुरुवात

दोन वर्षांच्या कोरोना संसर्गानंतर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरांतून भीम सागर उसळला आहे. पहाटेपासूनचं चैत्यभूमीवर महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी आनुयांयीच्या रांगा लागल्या आहेत. सर्वांना अभिवादन करता यावे, यासाठी समता सैनिक दल, मुंबई पोलीस, महापालिका प्रशासन शिस्तबध्द पध्दतीने भीम सैनिकांना रांगेत उभे राहून दर्शनासाठी  सोडत आहेत.
मुंबईसह राज्यातील खेड्यांपाड्यांतून आलेल्या आंबेडकरी आनुयांयीसह इतर जाती-धर्मातील नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. सकाळी ८ वाजेच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवारसह डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचीत बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदीं मान्यवरांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
समता सैनिक दलाची सलामी –
सकाळी ७ वाजेच्या दरम्यान समता सैनिक दलाने डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली. तसेच पंचशील ध्वजाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी समता सैनिक दलासह भीम सैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शिवाजी पार्कवर अलोट गर्दी –
चैत्यभूमीवरील डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर भीम सैनिकांचा जैत्था शिवाजी पार्ककडे जातांना दिसून येत आहे. याठिकाणी डाॅं.आंबेडकर यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ, खरेदी करतांना आंबेडकरी आनुयायी दिसून येत आहेत. तसेच बाबासाहेब, गौतम बुध्द,महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे तैलचित्र घेण्यासाठीही भीम सैनिकांची गर्दी होत आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या भीम सैनिकांना मुंबई महापालिकासह विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्याकडून मोफत भोजन व पाणी वितरण केले जात आहे. तर काही ठिकाणी चहा बिस्कीट, पोहे, शिरा या खाद्यपदार्थांचेही वाटप करण्यात येत आहे.
आंबेडकरी जलसा,पवाडे, गाणे – 
चैत्यभूमीच्या परिसरात सकाळपासूनचं तरुणांचा गट जसला आणि आंबेडकरी गीत गात आहेत. तसेच संविधान जनजागृती आणि स्वच्छ भूमी, चैत्य भूमी तरूणांच्या गटांकडून रस्त्यावर व शिवाजी पार्कवर पडलेला कचरा उचलण्यासाठी २०० स्वयंसेवक काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close