मुंबई

चैत्यभूमीवर समता सैनिक दलासह इतरांची ५ हजारांची फौज तैनात

 

भारतरत्न महामानव डॉं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चैत्यभूमीवर डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरांतून येणा~या आंबेडकरी आनुयायीच्या सोयीसाठी समता सैनिक दलासह इतर सैनिकांची सुमारे ५ हजार फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे 3 हजार व्यवस्थापक, स्वयंसेवक तर २ हजार समता सैनिक दलाचे अधिकारी व सैनिक राहणार आहेत. या सर्वांची व्यवस्था भारतीय बौध्द महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस. के. भंडारे यांनी दिली.

चैत्यभूमी ते वरळी, शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्टेशन, डॉ आंबेडकर भवन आणि डॉ बाबासाहेब यांचे निवासस्थान – राजगृह या ठिकाणी हे सर्व सैनिक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी या संपूर्ण परिसराचे १४ विभाग करण्यात आले आहेत. या दरम्यान भारतीय बौध्द महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय पदाधिकारी सह प्रमुख, उपपमुख, केंद्रीय विभागाचे पदाधिकारी व मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी, सहाय्यक उपपमुख, विभाग अधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक व बौद्धांचार्य, व्यवस्थापक व वॉर्ड तालुका व शहर शाखाचे पदाधिकारी व सभासद कार्यकर्ते यांना स्वयंसेवक म्हणून सेवेची १२ तासांची ड्युटी देण्यात आलेली आहे.

५ डिसेंबर रोजी महामानव डाॅं. बाबासाहेब आंबेडकर यांचा समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना, आदरांजली व वंदना सुत्रपठन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी सलामी व संचलन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता संस्थेचे सल्लागार अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय बौद्ध महासभेची आदरांजली सभा होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close