मुंबई

एसआरए प्राधिकरणातील कंत्राटी महिला कर्मचा~यांना भर पगारी प्रसूती रजा मंजूर

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी महिला कर्मचारी वर्गाना ३० नोव्हेंबरपासून भर पगारी प्रसूती रजा मंजूर करण्यात आल्याचा कार्यलयीन आदेश एसआरए प्राधिकरणाच्या सचिव यांनी काढले आहेत.  यामुळे सुमारे २०० ते ३०० कंत्राटी कर्मचारी महिलांना दिलासा मिळाला आहे.
एसआरए कार्यालयातील सर्व कंत्राटी व बाह्ययंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचा~यांसाठी पहिल्या दोन अपत्यांकरिता ६ महिन्यांची प्रसूती रजा लागू करण्यात आली आहे. यासाठी ६ महिन्याच्या वेतना इतक्या रक्कमेचा बाॅन्ड प्राधिकरणास देणे बंधनकारक असल्याचा कार्यलयीन आदेश सचिव संदीप देखमुख यांनी ३० नोव्हेंबर रोजी
काढला आहे.
प्राधिकरणाच्या विविध खात्यामध्ये काम करणा~या कंत्राटी महिलांना भर पगारी प्रसूती रजा मिळाली, यासाठी उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांनी पुढाकार घेवून १९ सप्टेंबर रोजी एसआरए प्राधिकरणाचे  सचिव यांना पत्राद्वारे महिलांची अडचण व कामाची परिस्थिती आणि संख्या निदर्शनास आणून दिली होती. या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांचीसुध्दा उपजिल्हाधिकारी गेवराईकर यांनी महिला कर्मचा~यांसोबत भेट घेवून सदर मागणीचे निवेदन त्यांनाही देवून पाठपुरावा सुरु ठेवला होता. या पाठपुराव्याला दोन महिन्यानंतर यश आल्याची माहिती वंदना गेवराईकर यांनी दिली.
या विभागात करतात कामे –
एसआरए प्राधिकरणातील सहाय्यक निबंधक (मुंबई शहर, उपसंचालक नगर रचना, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, मिळकत व्यवस्थापक/झोपुप्रा १४. माहिती व तंत्रज्ञान विभाग, बायोमेट्रिक सर्वेक्षण सेल, जनसंपर्क विभाग, देखभाल विभाग, सक्षम प्राधिकारी १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १० तसेच उपजिल्हाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी,  प्रशासकीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी (अ/नि) पूर्व उपनगरे, अपर जिल्हाधिकारी (अ/नि) पश्चिम उपनगरे, तक्रार निवारण समिती (मुंबई शहर), तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे), तक्रार निवारण समिती (ठाणे), लेखा शाखा, प्रशासन नस्ती विभाग आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close