सामाजिक

गौतम अदाणीकडून धर्मादाय संस्थेला ६०,००० कोटीची देणगी

गौतम अदाणी यांनी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आणि वडील शांतीलाल अदाणी यांच्या १०० व्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ धर्मादाय संस्थेला ६०,००० कोटी रुपयांची देणगी दिली. भारतीय उद्योग क्षेत्राच्या इतिहासात फाउंडेशनला दिलेल्या सर्वात मोठ्या देणग्यांपैकी ही एक असली तरी धर्मादाय देणगी हे आपल्याला समाजात जे अपेक्षित आहे त्याचा एक छोटासा भागच याद्वारे साध्य होऊ शकतो,
गौतम अदाणी यांच्या अदाणी कंपनीकडून शेतक~यांच्या १० कुटुंबांना ५० किलो धान्य देऊन एकूण ४,००० किलो धानाचे उत्पादन करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कृषी उत्पादन, उत्पन्न आणि अन्न सुरक्षा या सर्वांचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ झाली आहे. “मी समाजातील या मुलांच्या चेह-यावर हसू पाहिले”. ते म्हणतात. “माझ्या आयुष्यातील हा सर्वाधिक समाधानकारक आणि संस्मरणीय असा अनुभव आहे.”
गौतम अदाणी यांनी दिलेल्या देणगीतून आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात विनियोग होतो. आणि नेमकी हिच बाब ‘आत्मनिर्भर भारत’चा पाया अधिक भक्कम करते. मात्र जिग्नेशभाईंसारखे लोक चांगल्या निमित्तांसाठी त्यांच्याकडे असलेल्या सर्व पूरकतेसह जोडले जाऊन हा पाया आणखी भक्कम करत असल्याचे ते म्हणाले,
संस्थेंतर्गत आणि इतरत्र तसेच परोपकारी जगतात आणि त्यापलीकडे इतरांना प्रेरित करणे आवश्यक आहे. आणि गौतम अदाणी नेमके हेच योग्य रितीने करत आहेत. अदाणी थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी तसेच डहाणूचे रहिवासी जिग्नेशभाई बारी हे असेच एक निराळे उदाहरण आहे. बारी यांनी गरीब कुटुंबाला ५० किलो धानाचे बियाणे देण्याचा निर्णय घेतला आणि परिणामी अनेक धान्याचे उत्पादन तयार झाले. याशिवाय गरजू लोकांचे उत्पन्नही वाढले. तसेच लोकांचे राहणीमानही बदलले.
परिसरातील आदिवासी समाजाच्या गरिब परिस्थितीची जिग्नेशभाई यांना लहानपणापासूनच पूर्णपणे जाणीव होती. “येथील लोक स्थानिक पातळीवर रोजगार, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अविरत परिश्रम घेतात. गौतमभाईंकडून प्रेरणा मिळाली असल्याने मला काही तरी योगदान देण्याची इच्छा होती. मला समजले की, मी श्रीमंत झालो तरी गरजूंना मदत करणे थांबवू शकत नाही,” जिग्नेशभाई म्हणतात. “मला माझ्या अशा लहान मार्गाने सुरुवात करावी लागली. गौतमभाईंच्या औदार्याने प्रेरित होऊन मी गरीब स्थानिक आदिवासी कुटुंबांना ५० किलो धानाचे बियाणे देण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त त्यांना कृषी मालमत्तेतून अधिकाधिक उत्पादन कसे मिळवायचे याबद्दल सल्ला देण्यात आला आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close