मुंबई

मुंबई महापालिका प्रशासकाला कॅगची भीती; पालिका प्रशासनाची नायर रुग्णालयात घेतली गुप्त बैठक

कोरोना महामारीमध्ये मुंबई महापालिकेत कोविड सेंटर, रस्ते बांधणी आणि जमीन खरेदीसह अशा १२ हजार कोटीच्या ७६ कामांत झालेला भ्रष्टाचाराची कॅग कमिटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे धस्तावलेल्या मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅं.इक्बाल सिंग चहल यांनी नुकतीच नायर रूग्णालयातील हाॅलमध्ये पालिका प्रशासनासोबत 
गुप्त बैठक घेतली. या बैठकीला सुमारे एक तास आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केल्याचे सूत्रानी सांगितले. या बैठकिला कोरोना काळात बिल पास करणारे महापालिकेच्या २४ वाॅर्डातील सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त, कार्यकारी अभियंता, खाते प्रमुख, सहाय्यक अभियंत्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सोमवार, १२ नोव्हेंबर रोजी नायर रूग्णालयात घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक अधिका~यांनी महापालिका प्रशासक डाॅ.चहल यांच्यासमोर कोरोना काळात गेलेल्या कामांची व पास केलेल्या बिलांची माहिती दिली. यावेळी अनेक सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांची चक्क वाॅट्स अॅप मॅसेज व ई- मेलद्वारे मर्जीतील कंत्राटदार, कंपन्या आणि सामाजिक संस्थेतील अध्यक्षांना कामे दिली. यामुळे कोरोना काळात करोडो रूपये बिले खिरापतीसारखे पालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि मर्जीतील लोकांना दिल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात दबक्या आवाज सुरु आहे. कॅगने या सर्व प्रकरणात खोलपर्यंत चौकशी केल्यास अनेक मोठे मासे हाती लागल्याची शक्यतासुध्दा वर्तविली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात २१ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या कॅगच्या टिमकडून विविध विभागातील कामांची व फाईलची झाडाझडती सुरू आहे. या भीतीपोटी प्रशासक डाॅं.चहल यांनी अत्यंत हूशारीने महापलिका मुख्यालयात पालिका प्रशासनाची बैठक न घेता ती नायर रूग्णालयात घेतल्याने या बैठकीमागे काहीतरी दडल्याची माहिती
महापालिकेतील माजी नगरसेवकांनी दिली.
 कॅगच्या दहशतीमुळे महापालिका मुख्यालयासह पालिका विभाग कार्यालयातील प्रशासन फाईलींची जुळवा- जुळव करतांना दिसून येत आहेत. अशावेळी मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅं.इक्बाल सिंग चहल यांनी पहिल्यांदाचं महापालिका मुख्यालयात बैठक न घेता ती चक्क नायर रूग्णालयात गुप्तपणे घेतल्याची माहीती समोर आली आहे. सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी डाॅं.चहल यांनी नायर रूग्णालयातील हाॅलमध्ये पालिका कार्यालयातील सर्व सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंतासह इतर अधिकारी वर्गाची गुप्त बैठक घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रानी दिली. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पालिका मुख्यालयात ठाम मांडून बसलेल्या कॅगच्या टिमची भीती आता प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना वाटत असल्याचे चित्र महापालिका मुख्यालयात दिसून येत आहे.
कोरोना काळात कोविंड सेंटर, क्वारंनटाईन सेंटर, साहित्यांची चढ्या भावाने खरेदीसह इतर विकास कामांसाठी निविदा न मागविता मर्जीतील कंत्राटदार, कंपनी किंवा सामाजिक संस्थांना वाॅट्स अॅप, ई- मेलद्वारे करोडो रूपयांची कामे देण्यात आली होती. आता ही सर्व कामे महापालिकेच्या अंगलट आली आहेत. यामुळे कोरोना काळात  महापालिका प्रशासनाने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपाने महापालिकेच्या विकास कामांची कॅगद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार २१ नोव्हेंबरपासून कॅगची टिम महापालिकेत दाखल झाली असून त्यांच्याकडून कोरोना काळातील झालेल्या कामांचे आॅडिट व चौकशी करण्यात येत आहे. यामुळे भ्रष्टाचार आणि मर्जीतील लोकांना दिलेल्या कामामुळे दोषी अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका प्रशासक डाॅं.चहल यांनी अडीच वर्षांनंतर महापालिका मुख्यालय सोडून रूग्णालयात बैठक घेतली. यावेळी बैठकीमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी आयुक्तसमोर कोरोना काळातील केलेल्या कामांची जत्री सांगितली. यामध्ये काही सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांनी तर चक्क वाॅट्स अॅप मॅसेज, ई-मेल ग्राह्य धरून आपल्या मर्जीतील कंत्राटदार, कंपनी आणि सामाजि संस्थांना कामे दिल्याचे सांगितले. यामुळे आयुक्तही त्यांच्या राम काहण्या ऐकून धस्तावले. यामुळे अशाप्रकारे बेकायदेशिरपणे कामांचे वाटप करणा~या दोषी अधिकारी यांचे निलंबन व कार्यमुक्त होण्याचा धोका वाढला आहे. यामध्ये टार्गेटवर जम्बो कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरच्या कामांमधील भ्रष्टाचार केलेल्या अधिका~यांवर कारवाई होण्याची शक्यता पालिका सूत्रानी वर्तविली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनातील अधिकारी सर्व कामे सोडून केद्रीय लेखा परिक्षण (कॅग) च्या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close