मुंबई

विलास रुपवते यांच्या इशारानंतर रेल्वे प्रशासनाकडून गाड्या सुरळित करण्याचे परिपत्रक

भारतरत्न डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी रेल्वे प्रशासनाने ५ आणि ६ डिसेंबर रोजी २२ एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या होत्या. यामुळे राज्यभरांतून येणा~या आंबेडकरी आनुयांयीची प्रचंड गैरसोय होणार होती, यादृष्टीने मुंबईतील पॅंथर तथा शिवसेना नेते विलास रूपवते आणि भीम आर्मीचे नेते  अशोक कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिल्यावर दिल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने अखेर अधिकृत पत्र काढून रद्द केलेल्या २२ एक्सप्रेस गाड्या आणि मेगा ब्लाॅक मागे घेतला आहे. यामुळे आंबेडकरी आनुयांयीना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close