मुंबई

कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य उमेदवारांची यादी प्रसिध्द

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये , शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
 खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या तसेच माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी  न्यायालय , न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वंतत्ररित्या कळविण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे उपसचिव (परीक्षोत्तर) (अ.प.) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close