आरोग्य

गोवंडीत गोवरचा ८ वा बळी; मृतांची संख्या १३ वर;

मुंबईतील पुर्व उपनगरातील गोवंडी येथे वाढलेल्या गोवरच्या आजारामुळे गुरुवारी एका ८ महिन्याच्या बालकाचा मृत्यु झाल्या. यामुळे गोवंडीत गोवर बळीची संख्या आतापर्यंत १३ वर गेली आहे.
गोवर प्रतिबंधासाठी आवश्यक ९ महिने पूर्ण होण्यासाठी एक महिना राहिलेला असताना मुलाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४ दिवसात पूरळ आल्याने ८ महिन्याच्या या बालकाचा मृत्यू झाला आहे.
या बाळाला जन्मापासून सर्व लस देण्यात आल्या होत्या. ताप आणि पूरळ आल्याने रविवारी बाळाला श्वसनाचाही त्रास होऊ लागला. बाळाच्या पालकांनी त्याला रविवारीच पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याला विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यापासून बालकाला व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले. बाळाची प्रकृती खालावतच होती. अखेरिस गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी बाळाचा मृत्यू झाला. बाळाला गोवरच्या बाधेसह श्वसनाशी संबंधित न्यूमिनोया झाला होता. त्याच्या शरीरातील अवयव निकामी झाले, असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत गुरुवारी आढळून आलेल्या १९ संशयित गोवर रूग्णापैकी पुर्व उपनगरातील गोवंडी, देवनार, चेंबूर, मुलूंड,घाटकोपर, कुर्ला या विभागातून १० गोवर संशयित रूग्ण आहेत. ही सर्व संशयित रूग्ण दक्षिण मुंबई तसेच पूर्व उपनगरात आता गोवरची साथ पसरु लागली आहे. डी विभागासह, ए आणि आता बी वॉर्डात तसेच पूर्व उपनगरातील टी, एस, एन विभागांतही गोवरचे रुग्ण आढळले आहेत.
विभागनिहाय गुरुवारी नोंदवलेल्या गोवरबाधित रुग्णांची संख्या –
शहर – सी (१), डी (१), ई (२), जी-दक्षिण (२)
उपनगर – के (पश्चिम)- (२), पी-दक्षिण (१)
पूर्व उपनगर – एल (२),एस-पूर्व (२), एम-पश्चिम (३), एन(१), एस(१), टी(१)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close