राजकिय

आगामी काळात ठाकरे – आंबेडकर एकत्र येण्याचे संकेत

प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पण

आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात राज्यात ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येण्याचे संकेत दिसून येत आहे. ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले.
यावेळी अॅड. आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा.
शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
 उद्धव ठाकरेंची प्रकाश आंबेडकरांना साद –
 उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात भाषण करतांना प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केल.
काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू आहेत, असं म्हटलं होतं. तेव्हा मी त्याला एकत्र ये असं म्हटलं होत, असही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांसा भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा, त्याला मिनिटांचं गणित लागत नाही. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमचं दोघांचं एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close