मुंबई

अखेर कर्नाक उड्डाणपूल इतिहास जमा; लोकल सेवा सुरळीत

मुंबई सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील असलेला सर्वात जुन्या उड्डाणपूलाचे पाडकाम करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. सुमारे १५ तासांच्या अथक मेहनतीनंतर कर्नाक पूलाचे पाडकाम पुर्ण झाल्याने मध्य रेल्वेचा २७ मेगाब्लाॅक पुर्ण केल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली.
कर्नाक उड्डाणपूल मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल धोकादायक ठरविण्यात आला होता. मध्य रेल्वे हा पूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या कर्नाक पुलाचे पाडकाम शनिवार रात्री ११ वाजल्यापासून सुरु झाले. पहिल्या टप्यात सीएसएमटी ते कल्याण दरम्यान १७ तासांचा मेगाब्लॉक घेऊन दुपारी ४ वाजता सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची अप-डाउन धिम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील वाहतुक सुरु करण्यात आली. हार्बर मार्गावर २१ तासांचा ब्लॉक
घेण्यात आला होता. मात्र, वेळापत्रकाच्या आधी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ५.४६ वाजत पूर्ववत केली आहे. हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल-वडाळा लोकल वडाळा येथून ५.४६ वाजता सीएसएमटीसाठी रवाना झाली आणि सीएसएमटी-पनवेल लोकल सीएसएमटी स्थानकांवरून ५. ५२ मिनिटांनी रवाना झाली आहे. सध्या सातवी मार्गिका आणि यार्ड मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे आणि नियोजित वेळापेक्षा काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close