आरोग्य

मुंबईतील गोवर रूग्णांची संख्या १८४ वर लस घेण्याचे पालिकेचे आवाहन

मुबईतील पुर्व उपनगरांतील झोपडपट्टयांमध्ये गोवरचा जोर सर्वाधिक वाढलेला आहे. शनिवारी ८ गोवरबाधिक बालके आढळून आली आहेत. यामध्ये ३ एम.पुर्व विभागातील गोवंडी, मानखुर्द, एच.पुर्व विभागातील सांताक्रुज, वांद्रेतील ३ आणि प्रत्येकी १ जी.दक्षिण धारावी व एस वाॅर्डमधील भांडुप, विक्रोळी या वाॅर्डातील आहे. गोवंडी आणि सांताक्रुज, वांद्रे पुर्वतील बेहराम पाडा, गरिब नगर या अरूंद आणि दाटीवाटीच्या झोपडपट्टयांमध्येही गोवर बाधित रूग्ण आढळत आहे. यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबईत आजपर्यंतची निदान झालेल्या गोवर रुग्णांची संख्या ही १८४ झाली आहे. यामध्ये एम.पुर्व, एफ.उत्तर, जी.उत्तर, एल, एम,पश्चिम, पी.उत्तर आणि एच.पुर्व या ७ वाॅर्डात गोवरचा उद्रेक असल्याचा समावेश आहे. मुंबईतील ८ संशयित गोवर मृत्युपैकी १ रूग्ण हा मुंबई बाहेरचा असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
शनिवारी मुंबईत ११ नवीन गोवर रूग्ण रूग्णालयात दाखल झाले. तर २७ रूग्ण बरे होवून घरी गेली आहेत. तसेच कस्तुबा, गोवंडी, राजावाडी यासह इतर रूग्णालयात आतापर्यंत ७३ रूग्ण दाखल असून ६२ रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर ९ जणांवर आॅक्सिजनद्वारे उपचार सुरू आहेत. २ गोवर बालके व्हेटिलेंटरवर असल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.
गोवर रोग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुर्व उपनगरांत आणि पश्चिम उपनगरांतील झोपडपट्टयांमधील घरांचे सर्वेक्षण आणि लसीकरण युध्द पातळीवर सुरू आहे. मुंबईचे आतापर्यंत २४,०२८४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १७४ बालकांना ताप आणि पुरळची लक्षणे आढळून आली आहेत. अतिरिक्त लसीकरणाचे ८८४ सत्रे पार पडली आहेत. यामध्ये एमआर१ – ८१९९ आणि एमआरआर – ६८१० बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिध्द केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close