मुंबई

मुंबईतील डबेवाल्यांना हवी सुरक्षित पार्किंग सुविधासह सायकल मार्गिका

स्वतंत्र सायकल मार्गिका आणि सुरक्षित सायकल पार्किंग सुविधेची मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे. वातावरण फाऊंडेशन यांनी सस्टेनेबल मोबिलिटी नेटवर्कच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी समोर आल्या आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या डबेवाल्यांपैकी ८९% प्रतिसादकर्त्यांनी मुंबईत समर्पित सायकल मार्गिकेची मागणी केली आहे. सायकलसाठी सुरक्षित पार्किंगचा अभाव ही त्यांची सर्वात मोठी चिंता असून सुरक्षित पार्किंग सुविधा गरजेची असल्याचे १०० टक्के प्रतिसादकर्त्यानी सांगितले.
टिफिन डिलिव्हरीसाठी मुंबईतील डबेवाल्यांचे सायकल हे वाहतुकीचे प्राथमिक साधन आहे. मुंबई शहर आणि उपनगरांच्या नऊ भागांमधील ५०० डबेवाल्यांपैकी २२० जणांचे सर्वेक्षण यामध्ये करण्यात आले. सायकलिंगशी संबंधित पायाभूत सुविधांची स्थिती आणि डबेवाल्यांना टिफिन पोहोचवताना येणाऱ्या आव्हानांना समजून घेणे हे या सर्वेक्षणाचे उद्देश होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सुमारे पन्नास डबेवाल्यांच्या उपस्थितीत या सर्वेक्षण अभ्यासाचे अनावरण चर्चगेट येथे केले.
मुंबईतील डबेवाले कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या शहराच्या प्रयत्नांना हातभार लावत आहेत, ही सर्वेक्षणातून समोर आलेली चांगली बाब आहे. सर्व प्रतिसादकर्त्यांपैकी ९२% डबेवाले  प्राथमिक वाहतुकीचे साधन म्हणून सायकल वापरतात. हे सर्वेक्षण स्वच्छ हवा आणि इतर वितरण भागीदारांना सायकलची निवड करण्यास उद्युक्त करण्याबात डबेवाल्यांची प्रगतीशील भूमिकादेखील लक्षात आणून देते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वातावरण बदल समितीसाठी हे सर्वेक्षण ह्या विषयावरील एक सर्वसमावेशक दस्तावेज संदर्भ म्हणून काम करेल असे मला नक्की वाटते, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला वातारण फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान केसभट, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका डाॅं.अमिता भिडे सह डबेवाल्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close