मुंबई

कांदिवलीत एसी बसला आग; प्रवाशांचे थोडक्यात वाचले जीव

कांदिवली पुर्वकडील क्रांतीनगर येथून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली. मात्र रस्त्यावरील नागरिक आणि बेस्ट कर्मचा~याच्या धाडसामुळे बसमधील प्रवाशांचे जीव वाचले. सदर आगीत कुठलीही जिवितहानी झाली. मात्र मुंबईत वातानुकूलित बसमध्ये प्रवास करणा~या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कांदिवली गुरुवारी बस चालकाच्या कॅबिंनमध्ये शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली होती. भर रस्त्यावर लागलेली आग पाहताच रस्त्यावरील नागरिक आणि बेस्ट कर्मचारी यांनी अग्निशमन जवान येण्याआधीचं आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कांदिवली पुर्वकडील क्रांतीनगर विभागाकडे जाणारी बस क्र.२८८ ही लोखंडवाला येथील अलिका नगर या बस स्टाॅपवर आली होती. यादरम्यान चालकाच्या कॅबिंनमध्ये अचानक आग लागली. ही आग भडकण्याआधीचं चालकाने तात्काळ बसचे दरवाजे उघडल्याने बसमधील प्रवासी तात्काळ बाहेर पडले. या आगीमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली होती. कांदिवलीत दररोज क्रांतीनगर, दामूनगर, ठाकूर व्हिलेज, ठाकूर काॅम्प्लेक्स या रूटवर सुमारे २० ते ३० वातानुकूलित बेस्टच्या कंत्राटी बसेस चालतात. यामुळे या सर्व बसेसची फायर आॅडिट करण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.
कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी पध्दतीने वातानुकूलित बसेस बेस्ट परिवहन सेवामध्ये चालविण्यास सुरुवात केली. यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती करून सुमारे २ ते ३ हजार बसेस आज मुंबईत धावत आहेत. परंतु या बसेसमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याकारणाने प्रवाशांची सुरक्षा वा~यावर आहे. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने सदर एसी बसविषयी योग्य तो निर्यण घेवून मुंबईकरांचा सुरक्षित प्रवास करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जावू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close