राजकिय

आगामी महापालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा शिंदे गटाचा होईल; मंत्री सत्तार

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा हा शिंदे गटाचा अर्थात बाळासाहेबाची शिवसेना यांचा होईल, असे वक्तत्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागाठाणे येथे केला. ते मंगळवार, १८ आॅक्टोबर रोजी विभाग क्रमांक एकमधील मागाठाणेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांच्या देवीपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक १२  च्या नव्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग  संघटक मीना पानमंद,सिद्धीता मोरे, राज सुर्वे, संतोष नेवरेकर, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामुणकर, शिला गांगुर्डे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हजारोंच्या संख्येने महिला, जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती पाहून मंत्री सत्तार यांनी माझ्या सिल्लोड मतदार संघात इतकी गर्दी होत नाही, एवढी एका शाखेच्या उद्दघाटनाला झाली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत येथील नागरिक
त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मागाठाणे मतदार संघात
शिंदे गटाचा बोलबाला असेल असा ठाम विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
युवासेना कोअर कमिटी सदस्य राज प्रकाश सुर्वे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नव्या शाखेचा उद्दघाटन सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते २००० जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, देवीपाड्याच्या गोविंदाचे जगात १४० देशात नाव झाले. आमच्या शिवसेना शाखा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले एक ठेवा असून, या न्याय मंदिरात येणाऱ्या १०० टक्के नागरिकांना न्याय मिळून त्यांच्या समस्या सुटणार आहेत. आज फक्त एका शाखेच्या उद्दघाटनाला एवढी मोठी गर्दी आहे. आमच्या कामाने मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण करु अशी ग्वाही देत पालिका निवडणुका कधीही घ्या, आम्ही सज्ज असून आमच्या कामाने मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण करून पालिका निवडणुका जिंकून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मागाठाणेतील पाण्याची समस्या आपण विधानसभेत व नुकतीच डीपीडीसीच्या मिटींगमध्ये पालकमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री यांच्याकडेसुध्दा मांडली असून लवकरच ती सुटणार असल्याचे आ.सुर्वे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close