राजकिय

महापालिकेचे खोके कोण आहेत; हे तुम्हाला माहिती आहेत, मंत्री सामंतचे ठाकरेंवर टिकास्र

आम्हाला गद्दार म्हणणे फार सोपे आहे. आम्हाला खोके म्हणून हिणविता, मात्र मुंबई महापालिकेचे खोके कोण आहेत, ते तुम्हाला माहित आहे. असे टिकास्र शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केले. ते कांदिवली येथील समता विद्या मंदिर हाॅलमध्ये आयोजीत केलेल्या हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रामध्ये केली.
यावेळी संपर्क मेळावा यात्रामध्ये मराठी अभिनेता शरक्ष पोक्षे, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे, मिना पानमंद, वैभव भरडकर, शिवाजी शेंडगे,सचिन केळकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मनसेसह इतर राजकिय पदाधिका~यांनी मंत्री उदय सामंत आणि आ.प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यापुढे सामंत म्हणाले की, दोन वर्षांपुर्वी मुंबई विद्यापीठामध्ये संगित महाविद्यालर सुरु करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी कलिनाची जागाही देण्याचे ठरले होते. मात्र या संगित महाविद्यालयासमोर फार मोठा स्पीड ब्रेकर तयार झाला. दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने महाविद्यालय व्हावे, ही बाळासाहेबाची इच्छा होती. मात्र दुर्देवाने भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सदर महाविद्यालयाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याकडून अडीज वर्षांत काहीच झाले नाही, ते शिंदे सरकारने अडीज महिन्यांमध्ये केले. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर २२ दिवसांमध्ये तर संगित महाविद्यालयाचे काम सुरू झाले. त्यामुळे एखाद्या मुख्यमंत्र्याची इच्छा असेल तर ते अडीज दिवसांमध्येही होते. हे शिंदे यांनी दाखवून दिले. असा
टोला सामंत यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मागाठाणेतील सर्व महिलांना भविष्यात स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी कॅम्प भरून त्यांना कर्ज देण्याची जबाबदारी मी  पार पाडतो. यामुळे महिला आणि तरुणांना कर्जासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही.बॅकेचे अधिकारी तुमच्याकडे येतील, असा शब्द मंत्री सामंत यांनी मेळाव्यातील उपस्थित महिला आणि तरुणांना दिला. तसेच बीकेसीतील यावर्षीचा पहिला दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रेकाॅर्ड ब्रेक होईल, ज्याप्रकारे आम्हाला
हिणवले जाते, त्यांचे उत्तर आम्ही विकास कामांतून देणार आहोत. यामुळे आगामी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना – भाजपचा झेंडा फडकविण्यात येईल. असा दावा मंत्री सामंत यांनी यावेळी केला.
यावेळी अभिनेता शरद पोक्षे म्हणाले की, आता गुरा,ढोरांसारखे नेत्यासोबत जावू नका, तुम्हाला जे पटत असेल त्याच्या पाठीमागे जा. ख~या बाळासाहेबाच्या शिवसेनेत आमदार सुर्वे आणि मंत्री सामंत का गेले? यामागचा इतिहास जाणून घ्या. जोपर्यत इतिहास माहित होत नाही,तोपर्यत माणूस काय करू शकत नाही. शिवसेनेची वाटचाल समजून घेणे गरजेची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना नावाची संघटना आज एवढी मोठी झाली आहे. मात्र ती गेल्या काही वर्षांपासून काही लोकांच्या विचारांवर चालत आहे. यामुळे भविष्यात
 जर शिंदे आणि त्यांचा गट बाहेर पडला नसता, तर
 राष्टवादीमध्ये विलीन झाली असती. एकनाथ शिंदे आणि माझे वेगळे नाते आहे.त्याच्यासाठी मी शुटिंग बाजूला ठेवून ठाण्याला दोन ते तीन दिवस जावून बसतो. मला मंत्री पद नको, मी खाली बसेल परंतु हिंदूचा गळा दाबणारा पज्जाला मी सहन करणार नाही, असे मत पोक्षे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close