राजकिय

धनशास्त्र्यापेक्षा पर्यावरणशास्त्र महत्वाचे; लवकरच वनराणी सुरु होईल, वनमंत्री मुनगंटीवार

धनशास्त्र्यापेक्षा पर्यावरणशास्त्र महत्वाचे आहे. श्वास सोडल्यावर अर्थशास्र कसे टिकून राहू शकते. त्यामुळे जन्मोजन्मी वनसंपदेचा विचार करणे आवश्यक आहे. येत्या काळात राष्ट्रीय उद्यानाचे रुपडे पालटणार आहे. यासह अनेक वर्षांपासून बंद असलेली उद्यानातील मिनी ट्रेन (वनराणी) अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या हस्ते बुधवारी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर, वन्यजीव रुग्णालय कॅट ओरीएटेशन सेंटर, आठ रुग्णवाहिका, ४० दुचाकीचे उद्घाटन करण्यात आले.
यापुढे मुनगंटीवार म्हणाले की, मानवाला मोफत सर्व वनसंपदा मिळाली आहे. या वनसंपदेमुळे मानवीजीवन सुरळीत सुरू आहे. मात्र, मानवप्राणी वसुंधरेचे मोठे नुकसान करण्यास सुरुवात केली. जर, आताही आपण थांबलो नाही तर आपले अस्तित्व संपुष्टात येईल. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. मात्र, नॅशनल पार्कमध्ये आल्यावर दिसून येते की, स्वामी तिन्ही जगाचा आईऐवजी वनराणीविना भिकारी आहे. यामुळे लवकर वनराणी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पध्दतीने नागरिकांच्या सेवेसाठी सुरु होईल, असे आश्र्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
यावेळी महाराष्ट्र वन्यजीवचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री रविना टंडन यांची निवड केल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. याप्रसंगी रविना म्हणाल्या की, आताची आणि येणाऱ्या नवीन पिढीसह वन्यजीव, जंगलाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणार आहे. नामशेष झालेल्या चित्ते पुन्हा देशात आणले आहेत. त्याचा अधिवास वाढणार आहे. यासह वाघांची आणि वनांची वाढ झाली आहे. जर जंगल आहे तर आपण आहोत, त्यामुळे जंगल सुरक्षित करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
याप्रसंगी भाजपा आमदार तथा गटनेता प्रविण दरेकर म्हणाले की, वनखात्याला खऱ्या अर्थाने संजीवनी देण्याचे काम सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचे म्हणाले. मात्र पार्कमध्ये अद्यापही वन ग्रंथालय आणि वनराणी ट्रेन सुरु झालेली नाही. वनराणीची तिकीट खिडकीचे  दुस~या कुठल्यातरी वास्तूमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे वनराणी सुरु होणार आहे की नाही, हे सांगता येत नाही.
शासन कुणाचेही असो, वन ग्रंथालयासाठी मी गेल्या ८ वर्षांमध्ये ३० वेळा बैठका घेतल्या, निधीची तरदुत केली. मात्र गाडी काही पुढे हालत नाही. यामुळे जर वन ग्रंथालय बनले तर पार्कमध्ये मुलांना त्यांची मदत होईल, आणि त्यांना वन्य जीवांविषय माहिती मिळेल. यामुळे तुम्ही मंत्री असेपर्यंत तरी त्याचं उद्दघाटन व्हावे, अशी अपेक्षा आ.दरेकर यांनी मंत्री मुनगंटीवार यांच्यासमोर व्यक्त केली. तसेच वन जमिनीवर राहणारे लोक आजही वीज, पाणी पासून वंचीत आहे. कोर्टाचे निर्णय, केंद्र आणि राज्य सरकारचे नियम असतील ते तुम्ही पहा, आणि गरिबांना मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणीसुध्दा दरेकर यांनी लावून धरली. तर खासदार शेट्टी यांनीसुध्दा नॅशनल पार्कमध्ये येणा~या पर्यटकांचे तिकीट दर कमी करणे अपेक्षित आहे. पर्यटकांसोबत येणा~या लहान मुलांना खाद्यांसाठी पार्कमध्ये एखादे हॉटेल, स्टॉलची व्यवस्था देखील करणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिकांना उद्यानातील रोजगाराच्या संधी मिळेल. तसेच उद्यानाच्या एक किमी अंतराचा बफर झोन करणे चुकीचे असल्याचे मत खा. शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close